मज मराठा म्हणून का हिणवता...!
मज मराठा म्हणून का हिणवता...
गुलामीचे जिणं जाणून जगतो आम्हीं...
भीमाच्या कायद्याला आण ब्राम्हणाच्या कूटनीतीला घाबरतो आम्ही...
आमच्याच राजकारण्यांच्या दिल्ली लाळ घोटेपणाला पक्ष निष्ठा म्हणतो आम्हीं...
RSS आणि बामसेफच्या कात्रीत स्वतःच्याच बंधू विरोधात शड्डू ठोकतो आम्हीं...
बॉलिवूड नागवतो आमची अब्रू जगभर व्हीलनला नाव मराठ्यांचे देऊनी...
गुलाम कुत्री चाटतात नवं यौवनां-ललनांना रशियन व्होडका म्हणुनी…
मज मराठा म्हणू नका...
कुठे चुकून मी बोलिला स्वाभिमान अन
जागविला पराक्रम मराठ्यांचा
तर हुक्का पाणी बंद होईल माझा... बबॉ
बरे ते जिणं गुलामीचे मी आणि माझे काम भले....
जवळ करतो कुण्या दलिताला नातर चाकरी करतो कुणातरी शेंडीवाल्याची...
कोण बा शाहू-शिवबा...??
ते बाब्याच सांगो मज
नाहीतर नवं दलित कलम बहाद्दर
संभा तो गेला हकनाक बळी
होतें तेंव्हाही मराठे ...
हीच का ती गुलामी.
डरपोक औलाद साली मराठा !
58 मोर्चे 46 बलिदान वाया गेले
मिळवले जे सारथी रुपी
ते ही कुचकामी नेत्यांनी घालवले...
तेल ही गेले आणि तूप ही
मराठ्यांनो...
गा षंढ संस्काराचे गोडवे... अन हजरी लावा समर्थ बैठकी !
मी कसा अहिंसा वादी
अन मी कसा आदर्श !
चघळा थोरवी
नीच चांगुलपणाची...!!
पूर्वजांच्या पराक्रम विसरवला त्यांनी करोनि सांस्कृतिक दहशतवाद !
रक्तात दिधले षंढ गुलामीचे इंजेक्शन !
आणि अजुनी आम्हीं
जय भवानी l जय शिवाजीच करतो.
हात जोडोनि विनवतो हे राजाधिराजा...श्रीमंतां
मराठा मज म्हणू नका
मराठा मज म्हणू नका
प्रखर मराठावादी अमरसिंह राजे यांच्या उद्वेगातून उमटलेल्या भावना !
No comments