आम्ही पुत्र शहिदांचे - स्फूर्ती गान
स्फूर्ती गान
आम्ही पुत्र शहिदांचे | उभारू साम्राज्य कोटींचे || धृ
||
तुडवू त्या नराधमांना पायाशी |
जे नडले आमच्या बापाशी ||१ ||
नसा-शिरा-धमन्यांना पुन्हा स्फुरण द्यारे |
विश्वास घातकी गद्दारांना पेटवून आता द्यारे ||२||
शेतकर्यांची पोरं म्हणून उजळ माथ्याने फिरुया |
तरंग नाऱ्या औलादिना काळ्या मातीत लोळवूया ||३ ||
बहोत शिकलो आदर्शाचे धडे, आता बास रे |
सुंदर, आनंदी जीवन आम्हीही, आता जगू खास रे ||४||
आम्ही पुत्र शहिदांचे | उभारू साम्राज्य कोटींचे || धृ-३ विसर्ग ||
क्रांतिसूर्य
अमरसिंह राजे यांच्या धगधगत्या लेखणीतून ©२०२०
No comments