Header Ads

Header ADS

कान्हा हल्ली प्रेम...प्रेम नाही राहीलं. ..!

कान्हा हल्ली प्रेम...प्रेम नाही राहीलं. ..! 

इन्टरनेट वरून साभार 



ज्याने त्याने विश्वासघात आणि वासनेचच तत्व नात्यात वाहीलं
कान्हा हल्ली प्रेम प्रेम नाही राहीलं.....!!धृ!!

बघना कुणी अॅसिड ने चेहरा जाळतं
तर कुणी ऊगीच एखाद्याच्या भावनेशी खेळतं
कुणी सर्वस्व देऊनही सर्पडंखाचं दुःख साहिलं
  कान्हा हल्ली प्रेम प्रेम नाही राहीलं....!!1!!

नाही जानवत आधाराची भावना मिठीत
केवळ शरिराचा व्यवहार होतोय हर एक भेटीत
भोगून मनसोक्त कुणी खरं रुप दावीलं
  कान्हा हल्ली प्रेम प्रेम नाही राहीलं.....!!2!!

एकनिष्ठ पणा वॉन्टेड झालाय थांग पत्ताच नाही त्याचा
दोन्ही बाजूने विचार केला तर गुन्हा नसतोच एकाचा
गजाननाने अंतकरणातून हे सत्य लिहीलं
  कान्हा हल्ली प्रेम प्रेम नाही राहीलं.....!!3!!

 🖋 गजानन ऊफाडे
          (शब्दश्री)
पुणे..... (परभणी)
       7507442306

(सर्व हक्क स्वाधीन)

No comments

Powered by Blogger.